Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Severe Rainfall Causes Flooding Across Pune City : पुण्यात मुसळधार पावसामुळे पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले. महापालिकेच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित झाले असून सुधारणा करण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली.
Pune rain emergency meeting

Pune rain emergency meeting

esakal

Updated on

पुणे : पावसाने गुरुवारी पुणे शहर अक्षरशः तुंबले, रस्ते पाण्याखाली गेले. घरांत, दुकानात पाणी शिरले आणि एका ज्येष्ठ महिलेचा बळी गेला. त्यामुळे महापालिकेचे नियोजन कोलमडल्याचे चित्र समोर (Pune Rain Flooding) आले. त्यानंतर आज (ता. ३) पुणे महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागासह अन्य विभागांची तातडीची बैठक घेण्यात आली. कामात सुधारणा करण्यासाठी प्रशासनाला कंबर कसण्याचे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले आहेत. पाणी तुंबणाऱ्या २२७ पैकी १२० ठिकाणी सोमवारपासून (ता. ६) कामे सुरू केली जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com