Pune Rain : बुधवारपर्यंत शहरात मध्यम तर घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता

शनिवारी (ता. २४) मॉन्सून दाखल झाल्यापासून शहरात सर्वाधिक पावसाची नोंद पाषाण येथे झाली.
Rain News
Rain Newsesakal

Pune Rain - तब्बल तीन आठवडे उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनच्या पावसाने जोरदार बॅटींगला सुरवात केली आहे. शनिवार (ता.२४) पासूनच शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून, बुधवार (ता.२८) पर्यंत ही स्थिती कायम राहील. तसेच याच काळात पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे.

अरबी समुद्रात नुकतेच येऊन गेलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने मॉन्सूनची प्रगती रोखली होती. चक्रीवादळ ओसरल्यानंतर मागील आठवड्यात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले. अन् शनिवारी २४ तासांत मॉन्सूनने महाराष्ट्रासह देशाचा ९० टक्के भाग व्यापला.

Rain News
Mumbai Crime : पोलिसांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर गाडी चढवण्याचा केला होता प्रयत्न; आरोपीला तब्बल 2 वर्षांनी ठोकल्या बेड्या

एकाच दिवसात दिल्ली, मुंबई आणि नागपूरमध्ये मॉन्सून दाखल झाल्याची दुर्मिळ घटनेची नोंद झाली. पुणे शहरातही मागील ४८ तासांपासून मॉन्सूनचा पाऊस पडत असून, पुढील चार दिवस परिस्थिती अशीच असल्याने पुणेकरांनी घराबाहेर पडताना रेनकोट आणि छत्री सज्ज ठेवावी. काही निवडक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

आजवर ३५ मिलिमीटर पाऊस

यंदाच्या मोसमात पुणे परिसरात रविवार (ता.२५) पर्यंत ३४.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. साधारणपणे या कालावधीपर्यंत पुणे परिसरात सरासरी १२३.३ मिलिमीटर पाऊस पडायला हवा. यंदा सरासरी पेक्षा ८८.४ मिलिमीटर कमी पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेतील ही तूट शेवटच्या आठवड्यात कमी होईल, अशी आशा आहे.

Rain News
Mumbai Crime : पोलिसांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर गाडी चढवण्याचा केला होता प्रयत्न; आरोपीला तब्बल 2 वर्षांनी ठोकल्या बेड्या

पाषाणमध्ये सर्वाधिक...

शनिवारी (ता. २४) मॉन्सून दाखल झाल्यापासून शहरात सर्वाधिक पावसाची नोंद पाषाण येथे झाली. रविवारी सकाळी आठ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार मागील २४ तासात येथे २१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर शहरात शनिवारी सरासरी १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारच्या तुलनेत रविवारी पाऊस काहीसा कमी असला तरी दिवसभरात सरासरी ६.४ मिलिमीटर पाऊस पडला.

Rain News
Russia War : प्रिगोझिन आणि पुतीन यांची ओळख कशी झाली ?

खबरदारी घ्या...

- घाटमाथ्यावर पर्यटनासाठी जाणे टाळा

- वाहन चालकांनी निसरडे रस्ते, खड्डे आणि साचलेल्या पाण्यात दक्षता बाळगावी

- जोराचा पाऊस असल्यास सुरक्षीत ठिकाणी आसरा घ्या

Rain News
Mumbai Crime : पोलिसांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर गाडी चढवण्याचा केला होता प्रयत्न; आरोपीला तब्बल 2 वर्षांनी ठोकल्या बेड्या

शहरातील पर्जन्यमान (मिलिमीटर)

ठिकाण ः रविवारी सकाळी ९ पर्यंत ः रविवारी सकाळी ९ ते संध्या ६

शिवाजीनगर ः १४.२ ः ६.४

पाषाण ः २१.१ ः ७.२

लोहगाव ः १७.६ ः ९.०

चिंचवड ः १२.५ ः २

लवळे ः ८.५ ः २.५

मगरपट्टा ः २ ः ००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com