Pune Rain : "आपत्ती निवारणा'कडे 300 हून अधिक कॉल ! 

Pune Rain : "आपत्ती निवारणा'कडे 300 हून अधिक कॉल ! 
Updated on

पुणे - मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांना गेल्यावर्षी 25 सप्टेंबरला झालेला पाऊस आठवला...अन त्या भीतीने सुमारे 300 हून अधिक कॉल आपत्ती निवारण व्यवस्थापन कक्ष आणि महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे आठ तासांत आले. शहरात कोठेही जीवितहानी झाली नसल्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेने सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

महापालिकेला बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास मुसळधार पावसाचा "ऍलर्ट' वेधशाळेने कळविला. सकाळी अकरा वाजेपर्यंत महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांशी संपर्क साधून त्यांना तयारीत राहण्यास सांगितले. त्यानंतर महापालिकेचा पथ व पाणी पुरवठा विभागांना कळविले. त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत 39 ठिकाणच्या 60 शाळांमध्ये गरज पडली तर नागरिकांना हलविण्याची तयारी केली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून पावसाचा जोर वाढू लागला. रात्री नऊ ते साडेअकराच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे आपत्ती निवारण केंद्रासह क्षेत्रीय कार्यालयांकडे नागरिकांचे "कॉल' येण्यास सुरवात झाली. "आमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी साचत आहे', "नाल्यातील पाणी वाढू लागले आहे', "रस्त्यावरील पाण्याचे लोट सोसायटीत येऊ लागले आहेत', "सोसायटीची सीमा भिंत पडण्याची शक्‍यता आहे', असे नागरिक सांगत होते. त्यांना त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयांचे संपर्क क्रमांक देण्यात आले. तसेच महापालिकेची पथकेही तेथे पाठविण्यास सुरवात झाली. 
गेल्यावर्षी 25 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाची आठवण अजूनही नागरिकांच्या लक्षात असल्यामुळे त्यांना भीती वाटत होती, असे निरीक्षण आपत्ती निवारण कक्षाचे प्रमुख गजानन सोनुने यांनी नोंदविले. पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रामुख्याने सर्व कॉल हे पाणी साचल्याचे होते. अग्निशामक दलाकडेही गुरुवारी पहाटे दोन वाजेपर्यंत पाणी साचल्याचे 50 हून अधिक कॉल आले, अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com