
पुणे : शहरात मंगळवारी सकाळीच पावसाने दमदार हजेरी लावल्याने कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. सकाळी ९ ते १२ दरम्यान शहर आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली होती. दुपारनंतर मात्र, उघडीप दिली. दिवसभर पाषाण येथे १३.५, तर लवळे येथे सर्वाधिक २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर परिसरात ८ मिलिमीटर पाऊस पडला. बुधवारीही घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.