

The India Meteorological Department has forecast light rainfall and cloudy conditions in Pune for the next three to four days.
sakal
पुणे : गेल्या दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर शुक्रवारी (ता. १७) शहरात पुन्हा हजेरी लावली. सकाळच्या सत्रात शहराच्या उपनगरांसह विविध भागांत हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे गेले काही दिवस उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. तर पुढील तीन ते चार दिवस शहरात हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.