
पुणे : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. ताम्हिणी परिसरात दोन दिवसांपासून अतिवृष्टीसदृश पाऊस होत आहे. ताम्हिणी घाटात बुधवारी सकाळपर्यंत (त्याआधी २४ तासांत) तब्बल ५७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ भिरा परिसरातही ५६८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.