

Pune
esakal
पुणे: शहरात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध भागांत झाडे व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळी सात वाजल्यापासून शनिवारी (ता. ४) दुपारी बारा वाजेपर्यंत शहरात झाडपडीच्या एकूण २९ घटना घडल्या. या सर्व घटनांवर अग्निशमन दलाने तातडीने प्रतिसाद देत मदत व बचावकार्य पूर्ण केले असून, कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही.