पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पहाटेपासून हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी सकाळी काही वेळ ऊन पडले असले तरी, दिवसभर ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस कायम होता. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणेकरांना या हवामानामुळे गारवा जाणवत असला तरी, घाटक्षेत्रात प्रवास करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.