Pune Rain Update: पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात... खराडी, वाघोली परिसरात गारांचा मारा...

Pune Rain Update: पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. दिवसभराच्या उकाड्यानंतर संध्याकाळी पाऊस आणि जोराची हवा येत आहे. यामुळे वातावरणात काहीसा गारवा देखील निर्माण होत आहे.
Pune Rain Update:
Pune Rain Update:esakal

पुण्यात आजही ढगांच्या गटागटासह पावसाला सुरुवात झाली आहे. काल (मंगळवार) पुण्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. आज खराडी परिसरात गारांचा पाऊस होत आहे. बोराएवढ्या गारा जमिनीवर कोसळत आहेत. वाघोली परिसरात देखील गारांचा पाऊस सुरु झाला आहे. Pune Rain Update

पुणे शहर परिसरात दुपारपासून ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं उकाडाही जाणवत होता. त्यानंतर काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. खराडी, वाघोली परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.

उबाळे नगर परिसरात होर्डिंग कोसळले आहे. पावसासोबत जोराचा वारा देखील सुरु आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली आहे.

पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरची रांगा लागल्या आहेत. विद्युत तारा तुटल्या असल्यामुळे दोन चारचाकीचे नुकसान झाले. 

Pune Rain Update:
सेक्स एस्कॉर्टच्या नावावर होतेय तरुणांची फसवणूक

तर काल (मंगळवार) सायंकाळी वाघोलीत जोरदार पाऊस झाला. भावडी रोडला नदीचे स्वरूप आले होते. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या कमानी, बोर्ड तुटले तर अनेक होर्डींगच्या फ्लेक्सचे कापड फाटून इतरत उडाले होते. पुणे नगर महामार्गालगतही काही ठिकाणी पाणी साचले होते. (pune rain news)

Pune Rain Update:
अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया यांचे 'या' सिनेमातून मराठी सिनेविश्वात पदार्पण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com