

Pune Weather Forecast IMD Predicts Clear Skies And No Rain For Two Days Despite Evening Showers And Rising Heat
sakal
पुणे : उन्हाचा चटका आणि उकाडाक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना सोमवारी (ता. १९) सायंकाळी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. दिवसभर उन्हाचा चटका कायम होता. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास शहरात अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला. पुढील दोन दिवस हवामानात फारसा बदल होणार नसून, पावसाची शक्यता नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.