
Maharashtra Monsoon: केरळमध्ये शनिवारी दाखल झालेला मान्सून सोमवारी मुंबई-पुण्यात दाखल झाला. मुंबईमध्ये अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे रस्ते, रेल्वेट्रॅकर पाण्याखाली गेले आहेत. शिवाय मुंबई मेट्रोंच्या काही स्थानकं बाधित झाली आहेत. पुण्यातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली.