Waterlogging occurred in several parts of Pune city due to heavy rainfall.
sakal
पुणे - पावसाळी गटारांची स्वच्छता, नालेसफाई आणि पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी विशेष कामांसाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. तरीही सोमवारी (ता. २८) दुपारी अर्धा ते एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची दैना उडाली. मलनिःसारण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आलेल्या या कामांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.