

Fire brigade washes mud-covered Pune road after multiple two-wheeler accidents.
Sakal
पुणे : राजाबहादूर मील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने आज (ता. ४) सकाळी अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने जखमी झाले. एका बांधकाम प्रकल्पातील राडारोडा घेऊन येणाऱ्या डंपरमुळे रस्त्यावर चिखल झाल्याने हे अपघात घडले. अखेर अग्नीशामक दलाने हा रस्ता धुवून काढला. हा प्रकार समोर येऊनही बांधकाम विभागाकडून संबंधित बांधकाम प्रकल्पावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.