

पुणे, ता. २८ : रक्षाबंधनाचा सण आणि सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी प्रवासासाठी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पसंती दिली. रक्षाबंधनाच्या दिवशी शुक्रवारी सकाळच्या सत्रात पीएमपीच्या बसने सुमारे आठ लाख प्रवाशांनी, तर सुमारे दोन लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करत सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा पर्याय निवडला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या महिलांची आणि नागरिकांची मोठी गर्दी शुक्रवारी सकाळपासूनच बस स्थानकांवर होती. केवळ सकाळच्या सत्रातच सुमारे आठ लाख प्रवाशांनी पीएमपी बसने प्रवास केला. शहराच्या सर्वच प्रमुख मार्गांवर, विशेषतः स्वारगेट, शिवाजीनगर आणि हडपसर यांसारख्या वर्दळीच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. वाहतूक कोंडीतून सुटका आणि जलद प्रवासाची हमी देणाऱ्या पुणे मेट्रोलाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. शुक्रवारी रात्री आठपर्यंतच्या आकडेवारीनुसार, दोन लाख पाच हजार २६४ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. रस्त्यांवरील संभाव्य गर्दी टाळण्यासाठी अनेकांनी मेट्रो प्रवासाला प्राधान्य दिले. एकाच दिवशी लाखो नागरिकांनी पीएमपी आणि मेट्रोचा वापर केल्याने शहरातील रस्त्यांवरील ताण काहीसा हलका होण्यास मदत झाली. सार्वजनिक वाहतुकीला सणासुदीच्या काळात मिळणारा हा वाढता प्रतिसाद शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी सकारात्मक मानला जात आहे. पीएमपी प्रशासनाने प्रवाशांची गर्दी लक्षात घेत एक हजार ९४५ बसचे नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.