पुणे : रेल्वेत बहिणीवर बलात्कार करणाऱ्या मावसभावाला दहा वर्ष सक्तमजुरी

गुन्हेगार भाऊ हा ‘मर्चंट नेव्ही’मध्ये अभियंता होता.
Rigorous Imprisonment for Ten years to
Rigorous Imprisonment for Ten years tosakal
Updated on

पुणे : रेल्वेत बहिणीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मावस भावाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी हा निकाल दिला.

गुन्हेगार भाऊ हा ‘मर्चंट नेव्ही’मध्ये अभियंता होता. प्रकार १४ जुलै २०१५ रोजी संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पुण्यात मुलीच्या मावशीच्या घरी हा प्रकार घडला होता. याबाबत मुलीने भोसरी एमआयडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी काम पाहिले. घटनेच्या दिवशी मुलगी, तिची मावशी आणि आरोपी मावस भाऊ रेल्वेने पुण्यात येत होते. भोपाळ रेल्वे स्थानक येण्यापूर्वी मुलगी रेल्वेतील स्वच्छतागृहात गेली. तिथून बाहेर येत असताना आरोपीने तिला पुन्हा स्वच्छतागृहात ढकलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारेल, अशी धमकी मुलीला दिली. घाबरलेल्या मुलीने पुण्यात आल्यावर घडलेला प्रकार तिच्या मावशीला आणि मैत्रिणीला सांगितला.

गुन्हा सिद्ध करण्यासाठी ॲड. सप्रे यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यामध्ये मुलीची मावशी आणि मैत्रिणींची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने मावस बहिणीवर बलात्कार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून, त्याला अधिकाधिक कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. सप्रे यांनी केला.

मैत्रीणींसमोर मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न :

घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलीच्या मैत्रिणी तिच्या मावशीच्या घरी आल्या. त्यावेळी मुलगी त्यांना रेल्वेत घडलेली घटना सांगत असताना मावस भाऊ तिथे आला. त्यावेळी त्याने मुलीला जमिनीवर ढकलून तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मावशीने आणि मुलीच्या मैत्रिणीने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना मारहाण केली आणि घरातून पोबारा केला. या प्रकरणात आरोपीवर भोसरी एमआयडीसी आणि भोपाळ रेल्वे पोलिस ठाण्यात बलात्कार, खुनाचा प्रयत्न, धमकावणे यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील आणि सहायक पोलिस फौजदार नारायण पवार यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crime
crime
Potholes Emerge at Several Spots on Ashtavinayak Highway
Tehsildar Dr. Sachin Wagh
Marathi News Esakal
www.esakal.com