Pune : लाला बँकेला रिझर्व्ह बँकेची सभासदांना ६ टक्के दराने लाभांश वाटपास मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

Pune News : लाला बँकेला रिझर्व्ह बँकेची सभासदांना ६ टक्के दराने लाभांश वाटपास मंजुरी

नारायणगाव : लोकनेते माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांनी स्थापन केलेल्या लाला अर्बन बँकेच्या सभासदांना सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी सहा टक्के दराने लाभांश वाटप करण्यास रिझर्व्ह बँकेने मंजूरी दिली आहे. बँकेच्या १३ हजार ५८० सभासदांना ८१ लाख ७ हजार ९०७ रुपयांचा लाभांश वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले , उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लाला अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश देण्याची मागणी सभासदांनी केली होती. रिझर्व्ह बँकेची परवानगी घेऊन लाभांश देण्याचे आश्वासन या वेळी बँकेचे अध्यक्ष बाणखेले , उपाध्यक्ष गुंजाळ व माजी अध्यक्ष निवृत्ती काळे यांनी दिले होते. त्या नुसार सहा टक्के लाभांश देण्याचीमंजूरी रिझर्व्ह बँकेने काल दिली आहे.या बाबतची माहिती आज लाला बँकेच्या येथील मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

या वेळी उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालक निवृत्ती काळे, रामदास बाणखेले, अशोक गांधी, नितीन लोणारी, नारायण गाढवे, मंगेश बाणखेले, जयसिंग थोरात, संदीप लेंडे, सचिन कांबळे, सुनिता साकोरे, इंदुमती कवडे, सुनील भुजबळ, भानुदास टेगले, जैनुद्दीन मुल्ला, ज्ञानेश्वर औटी, राजू इनामदार, अरुण लोंढे, आशिष माळवदकर, दशरथ शेटे, निर्मल मुथा, राहुल पापळ, मुख्यकार्यकारी अधिकारी डी.एन. सुरम, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे, वरिष्ठ अधिकारी, प्रमोद कांबळे, वसुली अधिकारी संतोष पटाडे, मनोहर गभाले सर्व अधिकारी व सेवक उपस्थित होते.

अध्यक्ष युवराज बाणखेले म्हणाले ३१ ऑक्टोबर २०२२ अखेर बँकेचे भागभांडवल रु. १४ कोटी ८० लाख रुपये, ठेवी ३६३ कोटी २३ लाख रुपये , कर्ज वाटप २२५ कोटी ८६ लाख रुपये , नफा ४ कोटी ६ लाख रुपये ,एकूण व्यवसाय ५८९ कोटी ९ लाख रुपये असून माहे एप्रिल २०२२ पासून सातत्याने नेट एन.पी.ए. चे प्रमाण कमी राखण्यात यश आले आहे. माहे ऑक्टोबर मध्ये नेट एन.पी.ए. चे प्रमाण २.७५ % इतके असून बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. बँकेने रिझर्व बँकेकडे मोबाईल बँकिंग चा प्रस्ताव मंजुरीस पाठविलेला आहे. बँक उत्तम ग्राहक सेवेसाठी कटीबद्ध असून पाचशे कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट आहे. बँकेच्या प्रगतीत सेवकांचे योगदान मोलाचे आहे.

मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. डी.एन. सुरम म्हणाले बँकेच्या व्यवसाय वृद्धीसाठी विशेषतः दर्जेदार कर्जे व्यवहार वाढण्यासाठी बँकेने लगतचे अहमदनगर, ठाणे, सोलापूर, सातारा या चार जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र विस्तार वाढविण्यास रिझर्व बँकेकडे प्रस्ताव सदर केला आहे. लाभांश आश्वासन पूर्तता केल्याबद्दल जेष्ठ सभासद राजू इनामदार, किशोर पोखरणा, राजेंद्र बोरा यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. माजी अध्यक्ष काळे यांनी उपस्थीतांचे स्वागत केले. मानले.मंगेश बाणखेले यांनी आभार मानले.

टॅग्स :Pune NewsBankpunerbi