Pune Real Estate Market, Luxury Home Sales Rise 32%
esakal
पुणे, : पुण्यातील निवासी बाजारपेठेत जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत घरांची एकूण विक्री स्थिर राहिली असून, ग्राहकांचा उच्च किमतीच्या घरांकडे कल वाढल्याचे दिसून आले आहे. एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री वार्षिक ३२ टक्क्यांनी वाढून १३,३७२ झाली, तर दोन ते पाच कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री वार्षिक ३८ टक्क्यांनी वाढून २,८९७ वर गेली आहे.
या कालावधीत पुण्यात एकूण ३६,४०२ घरांची विक्री झाली असून, मागील वर्षातील याच कालावधीत ३६,४४७ घरांची विक्री झाली होती, असे नाइट फ्रँक इंडियाच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.