
पुणे : वाहनचालकांनो, आपण पुण्याहून मुंबई, बंगळूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर अथवा कोणत्याही महामार्गावरून प्रवास करीत असाल तर सुरक्षित आणि सावधपणे वाहन चालवा. कारणही तसेच आहे. पुणे परिक्षेत्रात मागील वर्षभरात एक हजार ३५ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी २०२३ मध्ये अपघाती मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक हजार १९१ इतकी होती. २०२३ च्या तुलनेत मागील वर्षात २०२४ मध्ये अपघातांचे प्रमाण घटले आहे. मात्र, बळी गेलेल्यांची आकडेवारी पाहता अपघात रोखण्यासाठी आणखी उपाययोजनांची गरज आहे.