

Strengthening the Industry-Academic Partnership
sakal
पुणे : ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा आधारित निर्णयप्रक्रिया आणि नव्या धोरणांच्या माध्यमातून राज्यातील नावीन्याचा विकास अधिक वेगाने घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीत तंत्रज्ञान, उद्योग आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येणे काळाची गरज आहे,’’ असे मत ‘महाराष्ट्र राज्य नवोपक्रम सोसायटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले.