
पुणे : सार्वजनिक ठिकाणी जाताना कशा प्रकारे स्वतःला सादर करावे, लोकांशी संवाद कसा साधावा, भाषा कशी असावी, देहबोली आणि व्यक्तिमत्त्व कसे असावे, असे शिष्टाचाराचे महत्त्वाचे धडे गिरविण्याची संधी पुणेकरांना मिळाली. शिष्टाचार क्षेत्रातील सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक असणाऱ्या सबिरा मर्चंट यांच्या मार्गदर्शनातून शिष्टाचारातील बारकावे उलगडले.