सीएनजी भरण्याच्या वादातून रिक्षाचालकावर हल्ला

सीएनजी भरण्याच्या वादातून रिक्षाचालकावर हल्ला
Published on

पुणे, ता. १८ : लोहगाव-वाघोली रस्त्यावरील खांदवे पेट्रोल पंप येथे रिक्षात सीएनजी भरण्याच्या वादातून एका रिक्षाचालकावर लोखंडी हत्याराने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी आरोपी सुहास मारुती पालवे (वय २६, रा. वाघोली) याला अटक केली आहे.
याप्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय रिक्षाचालकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी गुरुवारी (ता. १७) सकाळी साडेनऊच्या सुमारास रिक्षा घेऊन पेट्रोल पंपापर सीएनजी भरण्यासाठी रांगेत उभे होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या रिक्षाचालक पालवे याने गॅस भरण्याच्या कारणावरून फिर्यादींना शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि पालवे याने लोखंडी हत्याराने फिर्यादींच्या गालावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
..............

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे, ता. १८ : भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) चौकात गुरुवारी (ता. १७) पहाटे चारच्या सुमारास घडली. गुलाब रामजी गावीत (वय ३४, रा. वैदवाडी, हडपसर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी मृत व्यक्तीचे भाऊ सुभाष रामजी गावीत (वय ३२, रा. नाशिक) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुलाब गावीत हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह दुचाकीवरून जात असताना टेम्पोने (एमएच ४२ बीएफ ३०७७) त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. अपघातानंतर चालक मदतीसाठी न थांबता टेम्पोसह पळून गेला. या धडकेत गुलाब यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. पोलिस उपनिरीक्षक गणेश वानखडे फरारी चालकाचा शोध घेत आहेत.
...................
सहकारनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र लांबवले
पुणे, ता. १८ : सहकारनगर भागातील रणजित हाइट्सजवळ पायी जात असलेल्या ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी (ता. १७) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...............
पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास
पुणे, ता. १८ : निगडी ते भेकराईनगर या पीएमपी बसमध्ये प्रवासादरम्यान एका ६६ वर्षीय व्यक्तीच्या बॅगेतून दोन लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे आकुर्डी ते हडपसर असा प्रवास करत असताना बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या बॅगेतील दागिने चोरले. प्रवासादरम्यान ही चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिस अंमलदार डी. ए. कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com