Pune Auto
Pune Auto

Pune Rickshaw Driver Protest : आंदोलकांचा उद्रेक! रिक्षा सोडून चालक निघाले घरी

आरटीओ कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
Published on

पुण्यात रिक्षा चालकांचा संप अद्याप सुरुच असून मागण्या मान्य न झाल्यानं या आंदोलनाचा उद्रेक झाला आहे. यासाठी काही रिक्षा चालक आपल्या रिक्षा आंदोलनस्थळीच सोडून घरी निघाले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर येथील आरटीओ कार्यालयाच्या परिसरात हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. (Pune Rickshaw Driver Protest Outbreak driver left rickshaw and go to home)

Pune Auto
Border Row: मविआ खासदारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर हालचालींना वेग; शहांनी बोलावली दोन्ही राज्यांची बैठक

सुत्रांच्या माहितीनुसार, रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी रिक्षा संघटना आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्यामध्ये सोमवारी बैठक झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्यामुळं नाराज झालेले रिक्षा चालक रिक्षा रस्त्यातच सोडून घरी निघाले. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत रिक्षा रस्त्यात उभ्या करून ठेवणार असा आक्रमक पवित्राही या रिक्षा संघटनांनी घेतला आहे.

Pune Auto
Demonetisation: पुन्हा नोटबंदीचे संकेत! मोदींच्या मागणीनं अनेकांच्या उंचावल्या भुवया

आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यानं सकाळपासून सुरु असलेलं आंदोलन अद्यापही सुरूच आहे. यामुळं आरटीओ चौकातील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. यामुळं वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

आरटीओच्या चौकात येणाऱ्या चारही रस्त्यांवर रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा उभ्या केल्या आहेत. अद्याप मागणी पूर्ण झाली नसल्याने या रिक्षा रस्त्यांच्या मधोमध उभ्या करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्त खरबरदारीचा उपाय म्हणून राज्य राखीव दलाची तुकडी देखील आंदोलनस्थळी दाखल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com