Pune : PMT बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक ; किरकटवाडीतील तरुणाचा मृत्यू

स्वराज सकाळी कॉलेजला जातो म्हणून घरातून गेला होता
road accident
road accidentsakalmedia

किरकटवाडी: नांदोशी आणि सणसनगर या गावांच्या दरम्यान पीएमटी बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत किरकटवाडीतील अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा एक जण किरकोळ जखमी झाला आहे. स्वराज दत्ता हगवणे (वय 17, रा. बापुजीबुवा नगर, नांदोशी रोड, किरकटवाडी.) असे या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

स्वराज सकाळी कॉलेजला जातो म्हणून घरातून गेला होता. कॉलेजमधील मित्रांनी मिळून सणसनगर (ता. हवेली) येथील विहिरीत पोहायला जाण्याचे ठरवले. कॉलेज मधून पळून येत सहा मित्र दुचाकींवरुन सणसनगर येथे गेले. तेथून परत येताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नांदोशी व सणसनगर या गावांदरम्यान असलेल्या ओढ्याजवळील वळणावर किरकटवाडीकडून सणसनगरकडे येत असलेल्या पीएमटी बसची आणि स्वराज चालवत असलेल्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

समोरासमोर धडक झाल्याने स्वराजच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. सोबत असलेल्या इतर मित्रांनी तातडीने दुसऱ्या दुचाकीवरुन उपचारांसाठी रुग्णालयात नेले परंतु मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे मध्यरात्री उपचारांदरम्यान स्वराज हगवणे याचा मृत्यू झाला आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास प्रधान पुढील तपास करीत आहेत.

शोकाकुल नागरिकांची गतीरोधक बसविण्याची मागणी. अतिशय मनमिळाऊ व बोलक्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने किरकटवाडी, नांदोशी व सणसनगर परिसरात शोककळा पसरली आहे. किरकटवाडी- सणसनगर या रस्त्याला गतीरोधक नसल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. यापूर्वीही अनेक वेळा अपघात झालेले असल्याने अजून निष्पापांचा जीव जाण्याच्या अगोदर प्रशासनाने गतीरोधक तयार करुन घ्यावेत अशी मागणी परिसरातील शोकाकुल नागरिक करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com