Pune Accident: पुण्यात अपघातांची मालिका वेगवेगळ्या अपघातांत महिलेसह तीन जणांचा मृत्यू
Pune News: शहरात मुंढवा, औंध आणि खराडी बाह्यवळण मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. क्रेनच्या चाकाखाली ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर भरधाव वाहनांच्या धडकेत दोन पादचाऱ्यांनी जीव गमावला असून संबंधित चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.