Pune Accident: कात्रज घाटात एसटी बस-रिक्षाचा अपघात; रिक्षाचालकाचा मृत्यू, तिघे जखमी

Katraj Ghat Bus Rickshaw Accident: रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उर्वरित तिघांवर उपचार सुरू आहेत.
Pune News Today

Pune News Today

esakal

Updated on

कात्रज: पुण्यात कात्रज बोगद्याजवळ गुरुवारी (ता. २३) भीषण अपघात घडला. जुन्या कात्रज बोगद्याजवळ कात्रज घाटात एसटी बस आणि रिक्षा यांची जोरदार धडक होऊन रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस साताऱ्याच्या दिशेने जात होती, तर रिक्षा पुण्याकडे येत होती. कात्रज घाटातील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर रिक्षा रस्त्यावर पलटी होऊन मोठे नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com