Pune : सायकल स्पर्धेसाठी चकाचक केलेले रस्ते महिन्याभरात खचले; निकृष्ट दर्जाचं काम
Pune Road Chamber Collapse: आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेसाठी करण्यात आलेल्या रस्ते व चेंबर दुरुस्तीच्या कामावर निकृष्ट दर्जाचा ठपका लागला आहे. १४५ कोटींचा खर्च करूनही महिन्याभरातच चेंबर खचल्याने महापालिकेवर टीका होत आहे.
पुणे : पुणे महापालिकेने आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी तब्बल १४५ कोटी रुपये खर्च करून रस्ते डांबरीकरण, चेंबर समपातळीत आणण्याचे काम केले, पण आता एक महिना पूर्ण होत असतानाच चेंबर खचायला सुरुवात झाली आहे.