
पुणे : पुणे शहरातील रस्त्यांच्या रुंदीवरून वाद असताना दुसरीकडे राज्य शासनाने मात्र रस्त्यांच्या रुंदीबाबत स्पष्ट निर्णय घेतला आहे. विकास आराखडा करताना किमान नऊ मीटर रुंद रस्ता ठेवण्याची तरतूद केली आहे, तर महापालिका आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेली रस्त्यांची रुंदी कमी करण्याचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे.