Pune : ठेकेदार बदलला पण परिस्थिती बदलेना;स्थानिकांसह पर्यटकांचेही हाल

खडकवासला गावातून जाणाऱ्या मुख्य सिंहगड रस्त्यासह बाह्यवळण रस्त्याची अत्यंत दुरावस्था
pune
punesakal

किरकटवाडी: खडकवासला गावातून जाणाऱ्या मुख्य सिंहगड रस्त्यासह बाह्यवळण रस्त्याचीही अत्यंत दुरवस्था झाली असून मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे स्थानिकांसह खडकवासला धरण, सिंहगड, पानशेत या भागात येणाऱ्या पर्यटकांनाही मनःस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन निवादा काढली,ठेकेदारही बदलला मात्र परिस्थिती अद्याप जैसे थे असल्याने नागरिकांचे हाल थांबलेले नाहीत.

मागील सुमारे चार वर्षांपासून नांदेड फाट्यापासून पुढे सिंहगड रस्त्याचे काम सुरू आहे. अद्यापही रस्त्याचे काम अपूर्ण असून खडकवासला गावातील मुख्य रस्ता व बाह्यवळण रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. जोरदार पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यांना अक्षरशः तळ्याचे स्वरुप येत असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वेळा वन विभागाची परवानगी तर काही वेळा ठेकेदार काम करत नसल्याचे कारण पुढे करून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला, मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी अथवा पदाधिकारी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत का गंभीर नाहीत? असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.

मंत्र्यांना पायघड्या, नागरिकांकडे दुर्लक्ष......... गणेशोत्सव सुरू असताना मुख्यमंत्री व इतर आजी माजी मंत्र्यांचा या भागात दौरा झाला. सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, जिल्हा परिषद व महसूल विभागातील अधिकारी हे त्या परिसरातील रस्ते दुरुस्ती व नवीन रस्ते तयार करून घेण्यासाठी तळ ठोकून होते. खराब रस्त्यामुळे लाखो नागरिक वर्षानुवर्षे त्रासलेले असताना त्यांच्या सोयीसाठी कोणत्याच विभागातील अधिकाऱ्यांकडून अशी तत्परता कधी दिसली नाही.

"अगोदर नियोजित कॉंक्रिटीकरण रद्द करुन डांबरीकरण करण्याचा घाट घातला होता तो ग्रामस्थांनी उधळून लावला.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा केली असता आज काम सुरू होईल, उद्या काम सुरू होईल असे सांगून वेळकाढूपणा केला जात आहे. ठेकेदारही बदलल्याचे सांगितले जात आहे मात्र अद्याप काम सुरू झाले नाही." विजय मते, नागरिक खडकवासला.

"खडकवासला गावातील नागरिकांच्या मागणीनुसार सिमेंट कॉंक्रिटचाच रस्ता करण्यात येणार आहे. निवीदा प्रक्रिया झाली असून नवीन ठेकेदारही नेमण्यात आला आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. तोपर्यंत खड्डे बुजवून घेण्यात येतील." बाप्पा बहिर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com