Pune Potholes: विमाननगर, गणपती चौकात रस्त्याची चाळण; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण

Pune Potholes: विमाननगर, गणपती चौकात रस्त्याची चाळण; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण

Ganpati Chauk Pune: भले मोठे खड्डे पडल्यामुळे आणि त्यात पाणी साचून राहिल्यामुळे चौक ओलांडताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
Published on

Vadgaon Sheri Latest Update: विमाननगर येथील अतिशय रहदारीच्या गणपती चौकात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. नागरिकांना रस्त्याने चालणे आणि या चौकातून वाहन चालवणे अवघड झाले आहे.

विमान नगर येथील गणपती चौकात कायमच मोठी वर्दळ असते. वायुदल, यमुना नगर, नगर रस्त्याकडे जाणारा रस्ता आणि विमानतळाकडे जाणारे रस्ते या चौकात मिळतात. या चौकाच्या जवळपास शाळा, महाविद्यालय, बँका, मंदिर तसेच अनेक व्यावसायिक इमारती आहेत. नेमके या चौकात रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडल्यामुळे आणि त्यात पाणी साचून राहिल्यामुळे चौक ओलांडताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com