cycle competition
sakal
पुणे - टूर दी फ्रान्सच्या धर्तीवर ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धा पुणे शहर व जिल्ह्यात होणार आहे. यातील सुमारे ७५ किलोमीटरचा मार्ग पुणे शहरातून जात आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते डांबरीकरण, चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्ग दुरुस्ती यासह अन्य सुधारणांसाठी १४५ कोटी ७५ लाख ८० हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे.