पुण्यात वाहन RC सह नवीन लायसन्सचेही कामकाज बंद

राज्य सरकारने एक मेपर्यंत संचारबंदी लागू केल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजाबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.
RTO
RTO

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अपवाद वगळता नवीन वाहन नोंदणी, वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच शिकाऊ आणि पक्का परवाना कामकाज तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अर्जदाराच्या उपस्थितीविना ऑनलाइन कामे सुरु राहणार आहेत. केंद्र सरकारने १ फेब्रुवारी २०२० नंतर मुदत संपणारी योग्यता प्रमाणपत्रे, परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्रासाठी ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारने एक मेपर्यंत संचारबंदी लागू केल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजाबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.

नवीन नोंदणी : अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने आणि वाहन ४.० प्रणालीवर ज्या वाहनाच्या फिटनेसबाबत मोटर वाहन निरीक्षकानी परवानगी दिली आहे, अशी प्रलंबित प्रकरणे सोडून नवीन वाहन नोंदणीचे कामकाज बंद राहील.

RTO
पुणे : रेमडेसिव्हिरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या

वाहनविषयक काम वाहन : ४.० प्रणालीवर प्राप्त आणि नियमांची पूर्तता करणारी प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्यात येतील.

योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण : अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने सोडून इतर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज बंद राहील.

परवाना विषयक कामकाज : वाहन ४.० प्रणालीवर ऑनलाइन सर्व परवानाविषयक कामकाज चालू राहील. सारथी ४.० प्रणालीवर प्राप्त आणि नियमांची पूर्तता करणारी प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्यात येतील. परंतु नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

अंमलबजावणी पथकाने रस्ता सुरक्षेशी निगडित वाहनांची तपासणी करावी. वाहन अधिग्रहणाचे कामकाज प्राधान्याने करावे. बसमधून होणारी प्रवाशांची वाहतूक नियमानुसार होत असल्याची खातरजमा करावी. सीमा तपासणी नाक्यावरील कामकाज नियमितपणे चालू राहील, अशा सूचना परिवहन कार्यालयाने दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com