पुण्यात एक नोव्हेंबरला ‘राष्ट्रीय एकता दौड’

पुण्यात एक नोव्हेंबरला ‘राष्ट्रीय एकता दौड’
Published on: 

पुणे, ता. १० : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी पुण्यात एक नोव्हेंबरला ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन केले आहे. यंदाच्या वर्षी ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होतील, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री तथा दौडचे मुख्य संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या वर्षी दौडमध्ये २५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यंदा आतापर्यंत २० हजारांहून अधिक नोंदणी झाली असून, सहभागाचा विक्रम करण्याचे उद्दिष्ट आहे. स्पर्धेत २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर, पाच किलोमीटर फन रन आणि तीन किलोमीटर फॅमिली व बिगिनर रन अशा गटांचा समावेश आहे. विविध गटांतील विजेत्यांना १० लाखांहून अधिक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेले योगदान आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी’ हा केवळ धावण्याचा उपक्रम नसून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा लोकसहभागाचा उत्सव आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

नशामुक्तीचा संदेश :
यंदाची दौड ‘नशामुक्त युवा - विकसित भारत’ संकल्पनेवर आधारित आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून व्यायाम, क्रीडा आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, हा यामागील उद्देश आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात पुणेकरांनी कुटुंबासह सहभागी व्हावे, असे आवाहन मोहोळ यांनी केले.

नोंदणी संकेतस्थळ : www.runbuddies.club/puneunityrun

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com