pune run for unity 2026
sakal
पुणे - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी पुण्यात १ नोव्हेंबर रोजी ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होतील, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री, दौडचे मुख्य संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.