Daund crime news: दौंड तालुक्यातील घरफोड्यांतील २ वर्षे फरार असलेला १२ गुन्ह्यांचा आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जेरबंद

Housebreaking accused wanted in 12 cases for 2 years in Daund taluka arrested by LCB; दौंड तालुक्यातील घरफोड्यांतील १२ गुन्ह्यांचा फरार आरोपी दोन वर्षांनंतर पकडला; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई
Big Catch: Pune Rural LCB Arrests Absconding Burglar Involved in 12 Cases

Big Catch: Pune Rural LCB Arrests Absconding Burglar Involved in 12 Cases

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : दौंड तालुक्यात घरफोड्यांकरून २ वर्षापासून १२ गुन्ह्यात फरार असलेला आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी कोहिनूर विशाल पवार (वय २१,रा. म्हातोबाची आळंदी,ता.हवेली,जि.पुणे) याला अटक करण्यात आली आहे.२ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांचे पथक उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत फरारी आरोपी कोहिनूर पवार हा उरूळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत कुंजीरवाडी फाटा परिसरात असले बाबत खात्रीशीर बातमी मिळाली.वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे आदेशाने तात्काळ सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने आपण दौड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचे हद्दीत घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com