esakal | सहकारनगरमध्ये पारंपरिक पद्धतीने विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

सहकारनगरमध्ये पारंपरिक पद्धतीने विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सहकारनगर : गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...अशा जयघोषात आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला सहकारनगर व उपनगरात वाजतगाजत घरी नेले. उत्साह व मोठ्या भक्तीभावाने आज गणरायाची पारंपरिक पद्धतीने सहकारनगर, पद्मावती, अरण्येश्वर, ट्रेझर पार्क, धनकवडी, चव्हाणनगर इ भागात बाप्पांच्या मूर्ती खरेदीसोबतच सजावटीचे व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी लगभग करीत मोठ्या उत्साहात घरोघरी गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा केली गेली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वांनीच मास्क परिधान करुनच खरेदी केली. काही ठिकाणी गर्दी उसळली होती, मात्र बाप्पांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर लोक काही काळापुरते तरी कोरोनाला विसरुन जात उत्साहाने बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत मग्न होते.

loading image
go to top