Pune : विधी क्षेत्रातील अमर्याद संधींचे दालन ‘सकाळ लॉ सिंपोजियम’

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता उद्‍घाटन समारंभ
ujjwal-nikam
ujjwal-nikamsakal

पुणे : कायद्याच्या क्षेत्रात यशस्वी करिअर कसे करावे, कॉर्पोरेट कायद्यात खरंच संधी आहेत का, आंतरराष्ट्रीय कायद्यात कोणत्या संधी आहेत? तुमच्या मनातील अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. विधी क्षेत्रातील अमर्याद संधींचे दालन खुले करणारे ‘सकाळ लॉ सिंपोजियम’ शनिवारी (ता. १०) आयोजित केला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता उद्‍घाटन समारंभ होणार आहे.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात आयोजित या सिंपोजियमसाठी मॉडर्न विधी महाविद्यालयाने प्रायोजकत्व आणि एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ‘स्कूल ऑफ लॉ’चे सहप्रायोजकत्व आहे. विद्यार्थ्यांबरोबरच वकिल, कायद्याच्या अभ्यासकांसाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरेल. ॲड. निकम यांच्या मार्गदर्शनानंतर पॅनेल डिस्कशनचे आयोजन केले आहे. त्यात ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीकांत मालेगावकर, ॲड. गणेश हिंगमिरे यांचा समावेश आहे.

व्याख्याते ःवक्ते : विषय

सकाळी ११ : अमित आंद्रे : करिअरच्या प्रवाह बदलातील कृत्रिम बुद्धिमत्ता

विद्याधर भंडारे (सहायक प्राध्यापक, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ) : व्हॉट इज डिझाइन ॲँड अपॉर्च्युनिटीज इन द फिल्ड ऑफ डिझाइन

डॉ. विजय गोहकर : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया आणि करिअर

दुपारी ३ वा. : सकाळ लॉ सिंपोजियम उद्‍घाटन ॲड. उज्ज्वल निकम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com