अर्थकारण, विज्ञान, पर्यावरण ते अनुवाद अर्थकारण, विज्ञान, पर्यावरण ते अनुवाद

अर्थकारण, विज्ञान, पर्यावरण ते अनुवाद अर्थकारण, विज्ञान, पर्यावरण ते अनुवाद
Published on: 

पुणे, ता. १३ : विज्ञान, अर्थकारण, पर्यावरण, परराष्ट्र धोरणांपासून साहित्याच्या विविध प्रवाहांपर्यंतचे वैविध्यपूर्ण विचारमंथन शुक्रवारी रसिकांना अनुभवायला मिळाले. केवळ वैचारिक चर्चासत्रेच नव्हे, तर आशयघन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने ‘सकाळ लिट फेस्ट’चा दुसरा दिवस रंगला.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रांमध्ये विविध ज्ञानशाखांतील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अजित रानडे, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे, डॉ. बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, शाहू पाटोळे, कवयित्री नीरजा, बालाजी सुतार आदी मान्यवरांच्या भाषणांची पर्वणी उपस्थितांना मिळाली. विज्ञानकथा, अर्थकारण, धर्मकारण, खाद्यसंस्कृतीचा इतिहास, सत्ता संघर्षातील साहित्य, भारतीय ज्ञानपरंपरा, अनुवाद- कला की कौशल्य अशा अनेक विषयांवर या सत्रांमधून सखोल मंथन झाले. वाचकांसाठी हा दिवस एका मोठ्या वैचारिक मेजवानीसारखा ठरला.

साहित्याचा रंगमंचीय आविष्कार
दिवसभराच्या या वैचारिक आदान-प्रदानानंतर साहित्याचा रंगमंचीय आविष्कार रसिकांना खिळवून ठेवणारा ठरला. शब्दांच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा ‘अस्वस्थ अक्षरांचा वारसा’, ‘भयंकराच्या दरवाज्यात कोण’ आणि ‘वेदांसी विटाळ’ हे तीन सांस्कृतिक कार्यक्रम प्रभावीपणे सादर झाले. वैचारिक समृद्धी आणि दर्जेदार सादरीकरणाच्या अचूक मिलाफाने उपस्थितांचा उत्साह दुणावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.