Sakal Vastu Expo 2023 : अनेक गृहप्रकल्पांचे पर्याय एकाच छताखाली

पुणे शहरासह सातारा, कोल्हापूर या भागातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे विविध गृहप्रकल्पांचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
sakal vastu expo 2023
sakal vastu expo 2023sakal
Summary

पुणे शहरासह सातारा, कोल्हापूर या भागातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे विविध गृहप्रकल्पांचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

पुणे - पुणे शहरासह सातारा, कोल्हापूर या भागातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे विविध गृहप्रकल्पांचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे ग्राहकांच्या गर्दीत शनिवारी उत्साहात उदघाटन झाले असून रविवार (ता. २३) हा एक्स्पोचा अखेरचा दिवस आहे. फ्लॅट, बंगलो, रो-हाऊस, रिडेव्हपलपमेंट प्रकल्पातील आरामदायी सदनिकांसह एनए प्लॉट, कमर्शिअल प्रोजेक्टचे विविध पर्याय यात उपलब्ध आहेत.

‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे उदघाटन शनिवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, अभिनेते सौरभ गोखले, ड्रिमलॅण्ड प्रॉपर्टी बिल्डर आणि डेव्हलपरचे मनोज मोरे, केदार असोसिएटसचे मनोज आसावा आदींच्या उपस्थितीत झाले. गरज, बजेट, लोकेशन या सर्वांचा मेळ घालणारे अनेक पर्याय एक्स्पोच्या निमित्ताने ग्राहकांना उपलब्ध झाले आहेत.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया...

घर ही कुटुंबाची महत्त्वपूर्ण गरज आहे. पुणे शहरात स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात प्रत्येकाला जावं वाटतं आणि शोध मोहीम सुरू होते. या भटकंतीला पूर्ण विराम देण्याचं काम या एक्स्पोतून होत आहे. ‘सकाळ’ने ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक गृहप्रकल्पांची संधी उपलब्ध करून दिली असल्याने निश्चितच ही वेगळी भेट आहे.

- अजय मोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी

पुण्यात घर असलेल्या एका हिंदी कलाकाराची परवा भेट झाली. तेव्हा तो म्हणाला, या शहराचं अस्तित्व खूप वेगळं आहे, येथे आल्यावर पुन्हा जाऊ वाटत नाही. या आपुलकीमुळे अशा प्रदर्शनाची शहराला फार गरज आहे. ‘सकाळ’ने असे एक्स्पो करीत राहावे, याचा फायदा देशभरासह इतर देशांतील नागरिकांना निश्चित होईल.

- सौरभ गोखले, अभिनेते

पुणेकरांचा लाडका सकाळ वास्तू एक्स्पो आहे. येथे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पांची माहिती मिळते आणि विकासकांना सुद्धा ग्राहकांबरोबर थेट संवाद साधता येतो. त्यामुळे ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन प्रकल्पांचे नियोजन करणे शक्य होते

- अनिरुद्ध रांजेकर, संचालक, रांजेकर रिअॕल्टी

सकाळ वास्तू एक्स्पोचे नियोजन चांगले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी व प्रसिद्ध कलाकार आल्याने एक्स्पोला शोभा वाढली. जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन त्यांच्या मनासारखं घर खरेदी करावं. एकाच छताखाली भरपूर माहिती मिळेल.

- मनोज आसावा, केदार असोसिएट

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी असलेल्या घर, बंगलो, प्लॉट आदी गोष्टींची माहिती ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी याचा फायदा करून घ्यावा.

- मनोज मोरे, ड्रिमलॅण्ड प्रॉपर्टी बिल्डर आणि डेव्हलपर

मला फ्लॅट घ्यायचा आहे. ‘सकाळ’मध्ये मिळालेल्या माहितीनुसार मी इथं आलो. मला बऱ्यापैकी चांगले प्रोजेक्ट पाहायला मिळाले. माहिती चांगली मिळाली, बजेटच्या अनुषंगाने चांगले प्रदर्शन भरवले आहे.

- सचिन कराळे

कर्वेनगर परिसरात नवीन घर घेण्याचा माझा विचार सुरू आहे. त्यादृष्टीने उपयुक्त माहिती येथे उपलब्ध आहे. वेगवेगळे नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. इथलं वातावरण प्रसन्न करणारे आहे. इथला पुस्तकाचा स्टॉल देखील आवडला.

- राजेश रांका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com