पुणे : डॉक्‍टरच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abortion

पुणे : डॉक्‍टरच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री

मुंढवा: डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रीप्शन) बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या ग्राहकांना विकणाऱ्या चंदननगर येथील औषध विक्री दुकानातील दोन कर्मचाऱ्यांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. चंदननगर परिसरात बुधवारी रात्री उशीरा अन्न व औषध प्रशासन विभाग, महापालिकेचा आरोग्य विभाग व चंदन नगर पोलिसांनी संयुक्तपणे हि कारवाई केली. अविनाश गव्हाणे (वय 23 रा. वाघोली), विकास रोकडे (वय 34 रा. खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक विवेक खेडकर यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चंदननगर येथील "लाईफ स्टाईल फार्मा' नावाच्या मेडीकलमध्ये डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या विकल्या जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठवून या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश कांकरीया, निरिक्षक विवेक खेडकर, महापालिकेच्या परिमंडळ एकच्या विभागीय वैद्यकीय अधिकारी रेखा गलांडे यांच्या पथकाने संबंधीत मेडीकलवर रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास छापा घातला. मध्यरत्री उशीरापर्यंत संबंधित मेडीकलची अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तपासणी सुरु होती. त्यावेळी तेथे गर्भपाताच्या गोळ्यांची पाकीटे तेथे आढळून आले. तसेच संबंधित गोळ्या या डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय देण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.

"ते' दोन पोलिस कर्मचारी कोण ?

संबंधित मेडीकलमध्ये पोलिस मुख्यालयातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांची सातत्याने ऊठबस सुरू असते. त्यांच्या आशिर्वादानेच हा प्रकार मेडीकलमध्ये सुरु असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, चंदननगर पोलिसांनी हि कारवाई केल्यानंतर "ते' दोन पोलिस कर्मचारी कोण ? याबाबतही चांगलीच चर्चा सुरु होती.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत हि कारवाई करण्यात आली. त्यामध्ये बेकायदा गर्भपाताच्या गोळ्या विकताना दोन कर्मचारी आढळून आले. त्यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.'' सुनील जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चंदननगर पोलिस ठाणे.

Web Title: Pune Sale Abortion Pills Without Doctor Prescription

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..