
पुणे : छावा संघटनेकडून संभाजी महाराजांना अभिवादन
लोहगाव : छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती पुण्यात डेक्कन येथे साजरी केली.यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आत्मसाथ करावेत, शंभुराजेंचे अनेक भाषांवर असलेले प्रभुत्व, राजकीय रणनिती, निरव्यसनीपणा, माता-पिता सन्मान, स्वराज्याविषयीची आत्मीयता, घेतलेली जबाबदारी पार पाडण्याची सवय अशा सर्व गोष्टी आंगिकारणे सध्याच्या आयुष्यात गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी धनंजय जाधव, कार्याध्यक्ष गणेश सोनवणे, विनोद परांडे, संपर्कप्रमुख सुमित दरंदले, व्दारकेश जाधव, प्रविण भोसले, दिनेश कदम, माऊली बोबडे, धनराज त्रिगुळे, शैलेश तारडे, प्रणव गरुड व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Title: Pune Sambhaji Maharaj Jayanti Greetings
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..