Pune Crime : कात्रजमध्ये बंगल्याच्या आवारातून चंदनाची चोरी, पोलिसांची तपासणी सुरू
Pune sandalwood tree theft : पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शेलारमळा परिसरातील बंगल्याच्या आवारातून मध्यरात्री चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेले. भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शहरात वाढत्या चंदन चोरीमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका बंगल्याच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.