esakal | पुणे: नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वच्छता अभियान । Sanitation campaign
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वच्छता अभियान

पुणे: नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वच्छता अभियान

sakal_logo
By
सुषमा पाटील.

रामवाडी : आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारद्वारा दिनांक 27 सप्टेंबर 13 ऑक्टोंबर दरम्यान नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वच्छता अभियान मोहीम आयोजित करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अनिल डोळे यांनी दिली.

आझादी का अमृत महोत्सव योजना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आदेशानुसार नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक पाच वडगावशेरी कल्याणीनगर मध्ये क्षेत्रीय कार्यालयामार्फत शहरातील घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमात सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था बल्क वेस्ट जनरेटर सोसायट्या,खाजगी कचरा व्यवस्थापक, स्वच्छ संस्था, स्वच्छता मोहिमेमध्ये सातत्याने भाग घेणाऱ्या संस्था अशा सर्व संस्थांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.

यामध्ये कल्याणीनगर परिसरातील वॉटर फ्रंट कंडोमिनियम सोसायटी, लँड मार्क गार्डन सोसायटी, सिल्व्हर ओक सोसायटी, टीम स्वच्छ कल्याणी नगर ग्रुप, स्वच्छ वडगाव शेरी ग्रुप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सदर सर्व संस्थांचे प्रतिनिधी सोसायटी अध्यक्ष , नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त सुहास जगताप, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अनिल डोळे, आरोग्य निरीक्षक मुकुंद घम , मुकादम बाळासाहेब सोनवणे, अविनाश मोरे, गणेश रणावरे, मनोज देवकर आदी उपस्थित होते.

loading image
go to top