
Khed Taluka Ambethan News: उद्योगनगरी म्हणून पुढे आलेल्या सावरदरी ( ता.खेड ) गावाने आपली बैलगाडा ही जुनी आवड आजही जपली आहे.गोंधळजाई देवी उत्सवानिमित्त 'सरपंच केसरी' ही बैलगाडा शर्यत गावात घेण्यात आली.चार दिवस चाललेल्या या शर्यतीत ५२५ बैलगाडे सहभागी झाले होते.शर्यतीचे आयोजन स्मार्ट व्हिलेज सावरदरीचे विद्यमान सरपंच संदिप बाळासाहेब पवार यांनी केले होते.
७ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडल्या.तर ११ जानेवारीला फायनल आणि मेगाफायनल पार पडल्या.स्पर्धेमध्ये १ ट्रॅक्टर,१ बुलेट, १० दुचाकी,५ फ्रिज,३ एलईडी अशी अनेक बक्षीस ठेवण्यात आली होती.
.