

SARTHI Student Protest
Sakal
पुणे : संशोधन सुरू ठेवा, असं सांगतात; पण घरभाडे आणि प्रवासाचा खर्च कुठून भागवायचा, असा प्रश्न आता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थे(सारथी)अंतर्गत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. संशोधनासाठी निवड होऊन तीन-चार वर्षे उलटून गेली, तरी घरभाडे, इतर खर्च आणि जानेवारी ते जून २०२५ या कालावधीतील अधिछात्रवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यांत अद्याप जमा झालेली नाही. संस्थेकडे निधी उपलब्ध असूनही जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.