ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
Published on

खेड शिवापूर, ता. २० : पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी पुलाखाली बुधवारी (ता. १९) दुपारी ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. संस्कृती राजू पिसे (रा. रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास शिंदेवाडी उड्डाणपुलाखालील सेवारस्त्यावर हा अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देऊन काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने संस्कृतीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी राजगड पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com