
आयुक्तपदावरून सौरभ राव यांची पावणे दोन वर्षांत बदली झाली आहे.
पुणे : पुणे महापालिकेची आयुक्त सौरभ राव यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. तर, गायकवाड यांच्याजागी राव हे नवे साखर आयुक्तपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. आयुक्तपदावरून राव यांची पावणे दोन वर्षांत बदली झाली आहे. राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश राज्य सरकारने मंगळवारी काढला. त्यात राव यांच्यासह पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा होती. त्यात राव आणि गायकवाड यांचा समावेश आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या बदलीनंतर राव यांची एप्रिल 2018 मध्ये महापालिका आयुक्तपदावर नेमणूक झाली. या काळात नियोजित मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा आसखेड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती दिली. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे, "पीएमपी'च्या ताफ्यात नव्या बसगाड्या आणून ही व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी भूमिका घेतली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचा प्रश्नही त्यांनी बहुतांशी प्रमाणात सोडविला. मात्र, वर्षानुवर्ष रेंगाळेले "एचसीएमटीआर' नदीसुधार (जायका), नदीकाठ संर्वधन योजनां पुढे सरकाविल्या; परंतु,निविदांमधील वादाने त्या अंमलबजावणीपर्यंत पोचू शकल्या नाहीत. त्याशिवाय, हापालिकेत समावेश झालेल्या गावांत पायाभूत सुविधा विस्तारण्यावर राव यांचा भर रहिला.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे►क्लिक करा
एकच अर्थसंकल्प
महापालिकेतील बहुतांशी आयुक्तांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची तीन महिन्यांनी बदली झाली. त्यामुळे कुणाल कुमार यांनी सलग चारवेळा महापालिकेचा अर्थसंकल्प मांडला. मात्र, राव यांना एकच अर्थसंकल्प मांडण्याची संधी गेल्या वर्षी मिळाली. ते दुसऱ्यांदा पुढच्या चार-पाच दिवसांत अर्थसंकल्प सादर करणार होते. त्याआधीच त्यांची बदली झाली.