Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणात निघाल्या आळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune university

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणात निघाल्या आळ्या

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रीफेक्टरी येथे विद्यार्थ्यांच्या जेवनात अळी आढळून आल्यामुळे कुलूप लावण्यात आले. असा प्रकार दररोज होत असल्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थी त्रस्त झालेले आहेत त्याचबरोबर विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील सर्व मेसचे शुल्क वाढवलेले आहेत.

विद्यापीठातील विद्यार्थी कमावर शिकवा योजनेअंतर्गत आपले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना ही शुल्क वाढ परवडणारी नाही. तरी देखील ती शुल्क वाढ मान्य करायला तयार आहेत. जर जेवणाचा दर्जा सुधारत असेल तर पण विद्यापीठ प्रशासनाने फक्त शुल्क वाढ केलेले आहे. त्याबरोबर जेवणाचा दर्जा सुधारलेला नाही. रीफॅक्टरी चालक विद्यार्थ्यांशी व्यवस्थित बोलत नाही विद्यार्थिनींशी हुजत घालतो अशी अशी तक्रार देखील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परिषदेकडे केली होती.

विद्यार्थी परिषदेने काल रात्री साईन कॅम्पेन चालवलं होतं ज्यात जवळजवळ 400 विद्यार्थ्यांनी साइन करून विद्यापीठातील रीफॅक्टरीचे जेवण व्यवस्थित नाही. अशी प्रतिक्रिया दिली होती या सर्व विषयांमध्ये विद्यार्थ्यांची मागणी हीच आहे. की मेस चालक हद्दपार करण्यात यावा त्याबरोबरच सर्व मेस साठी एक कमिटी नेमावी ज्यात विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश असेल व जेवणाचा दर्जा सुधारावा.

- महादेव रंगा,अभाविप विद्यापीठ अध्यक्ष