Pune News: शाळा महाविद्यालयात रंगू लागली स्नेहसंमेलने

सय्यदनगर येथील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संस्थेचे तीसावे वार्षिक स्नेहसंमेलन वानवडी
Pune News
Pune Newssakal

हडपसर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक व्हावे, पालकांना पाल्याची गुणवत्ता जोखता यावी व एकमेकांबद्दलचा स्नेह वृध्दिंगत होऊन आदराने तो जपला जावा, या उद्देशाने दरवर्षी शाळा महाविद्यालयात साजरी केली जाणारी स्नेहसंमेलने सध्या रंगात आली आहेत.

सय्यदनगर येथील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संस्थेचे तीसावे वार्षिक स्नेहसंमेलन वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात उत्साहात साजरे झाले.

संस्थेच्या इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमाने संयुक्तपणे निरोगी आरोग्य, शिक्षणाचे महत्व आणि सामाजिक एकता या विषयांवर जनजागृती करत कार्यक्रम सादर केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील भारूड, लावणी, वारकरी संप्रदाय आदी लोककलांसह बेटी बचाव, वृक्षसंवर्धन, महिला सबलीकरण या विषयांवर प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. शफी इनामदार, निवृत्त कप्तान आर. भास्करण, फातिमा चक्कीवाला, ऍड. बाळासाहेब महाडिक, नदीम मुजावर, बाळासाहेब घुले, धर्मराज मेहेत्रे, जबीन सय्यद, ख्वाजा पठाण, रहेमान शेख, साद इनामदार, रियाज इनामदार आदी प्रमुख पाहुण्यांसह शिक्षक व पालक उपस्थित होते.

संचालिका शकीला इनामदार, डॉ. मुसद्दीक इनामदार, हुमेराह इनामदार, फहीम इनामदार, प्रा. शोएब इनामदार, रिफान इनामदार यांनी संयोजन केले.

साने गुरुजी शिक्षण संस्था संचलित हडपसर येथील बालवाडी विभाग आदर्श विद्यामंदिर शाखा क्रमांक चार व पाच यांचा बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा झाला. प्रमुख पाहुणे राष्ट्रसेवा दलाचे गंगासागर देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.

चिमुकल्यांनी यावेळी नृत्य, गायन, नाटक असे कलाविष्कार सादर केले. पालक व शिक्षकांनी टाळ्यांध प्रतिसाद देत त्यांना प्रोत्साहन दिले.

ज्ञानवर्धिनी शाळेच्या सचिव सोनल तुपे, तसेच प्रतिमा तुपे, पल्लवी पुंड, शिवाजी खोमणे, कालिदास जगताप, वसंत नवले, सुभाष आरोळे, पांडुरंग भुजबळ, सगाजी मोडक यावेळी उपस्थित होते. बालवाडी विभाग प्रमुख उज्वला घोलप, मुख्याध्यापिका वैशाली गांगुर्डे, संगीता जाधव यांनी संयोजन केले.

माळवाडी येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी शैक्षणिक संकुलात ४९ वे वार्षिक स्नेहसंमेलन झाले.

त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे हस्तकला, चित्रकला व विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. रोटरियन डिस्ट्रिक्ट डायरेक्टर डॉ. पल्लवी साबळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

संस्थेचे सचिव अनिल गुजर, मुख्याध्यापक सुरेश गुजर, तसेच प्रविण नाडकर्णी, जितेंद्र घनगस, कृष्णा भट्ट यावेळी उपस्थित होते. बालचमुंनी देशभक्तीपर गीत, भक्तीगीत, शिवशौर्यगीत, गोंधळ, भारूड, कोरोनावर आधारित गीत व शिवकालीन रणसंग्राम या नृत्यातून आकर्षक कलाविष्कार सादर केला.

हडपसर कर्णबधीर दिव्यांग विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर रंगीबेरंगी सुगंधी फुलांच्या रांगोळ्या काढून पाहुण्यांचे स्वागत केले.

मधुबनी चित्रशैलीतून व्यासपीठ सजविण्यात आले होते. त्यावर या विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार सादर केला.प्रमुख पाहुणे म्हणून आयुष गोयल, नवीन गोयल, विजया पेटकर, सूहृद मंडळाच्या कार्याध्यक्षा अनुराधा फातरफोड, शाळा प्रतिनिधी रजनी फडके उपस्थित होते.

मुख्याध्यापिका मुग्धा जगताप, विवेक बनगर, पुरुषोत्तम पाटील, सचिन म्हस्के, सचिन इंगळे, विद्यार्थी प्रतिनिधी संकिता घाडगे, जयप्रकाश धुडकनाळे, साहिल शहा, मोनाली जगताप, संगीता उकिरडे, सरिता ससाणे, कृतिराज सोनवलकर यांनी संयोजन केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com