उत्तमनगरमधील शाळेचा १०० टक्के निकाल

उत्तमनगरमधील शाळेचा
१०० टक्के निकाल
Published on

वारजे, ता. ८ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या उत्तमनगरमधील माध्यमिक विद्यालयाने एसएससी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची उल्लेखनीय परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील सर्व ७१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये वैष्णवी धुरी (प्रथम) हिने ९२.२ टक्के, वैष्णवी वर्मा (द्वितीय) हिने ८८.८ टक्के, तर गणराज शिंदे (तृतीय) याने ८७ टक्के गुण मिळविले आहे. मुख्याध्यापक ए. आर. खोपडे व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com