Pune : सात वर्षाच्या कुमूदला गरज होती ऑक्सिजनची; खानापूरच्या आरोग्य केंद्रात पोहणाऱ्या सात जणींवर झाले प्रथमोपचार

‘बुडलेल्या व्यक्तींना प्रामुख्याने फुफुसात पाणी गेले का, याची दोन- तीन प्रकारे तपासणी केली जाते.
खानापूर आरोग्य केंद्र
खानापूर आरोग्य केंद्र sakal

खडकवासला - गोऱ्हे खुर्द येथे पोहण्यासाठी गेलेल्या सात जणींना तातडीने पाण्याबाहेर काढले. खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यावेळी कुमुद संजय खुर्डे (वय ७) हि या घटनेत जास्त घाबरलेली होती. मुलीला ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पाण्याबाहेर काढलेल्या सात जणींना अडीच तीन किलोमीटरवर असलेल्या खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वागत रिंडे व त्यांच्या कर्मचाऱ्यानी प्रथमोपचार केले. यामध्ये कुमूदसह शीतल अशोक लहाने (वय १६), पायल संजय लहाने वय १२, राशी सुरेश मांडवे (वय १६),

खानापूर आरोग्य केंद्र
Mumbai Local : मेगाब्लॉकने ऐन लग्नसराईत मुंबईकरांचे मेगाहाल

कुमुद संजय खुर्दे (वय ७), मीना संजय लहाने (वय ३०), पायल संतोष सावळे (वय १८), पल्लवी संजय लहाने(वय १०) यांच्यावर प्राथमिक उपचार झाले. त्यावेळी पल्लवी संजय लहाने (वय १०) ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने तिला तातडीने खडकवासला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘बुडलेल्या व्यक्तींना प्रामुख्याने फुफुसात पाणी गेले का, याची दोन- तीन प्रकारे तपासणी केली जाते. पाणी बाहेर काढणे, बुडाल्यावर घशातील स्त्राव आत जातो. गुदमरलेले असतात. रक्तदाब, शुगर तपासून त्यांना घरी सोडले आहे.’ असे डॉ.स्वागत रिंडे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

खानापूर आरोग्य केंद्र
Mumbai : उन्हाचा फटका त्यात अघोषित भारनियमन, डोंबिवलीकर नागरिक हैराण

दरम्यान, खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.शब्दा शिरपूरकर यांनी येथील खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या मुलीची तपासणी केली. सकाळी दाखल केल्यावर तिला ऑक्सिजन लावला होता. ती सध्या व्यवस्थित आहे. तिला आता ऑक्सिजनची आवश्यकता नाही. तिला काही वेळाने घरी सोडणार आहे. असे डॉ.शिरपूरकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com